गोंदिया,
दि.20 : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-2026) मोहिमेत गोंदिया जिल्ह्यात लक्षणीय
प्रगती झाली असून शनिवारपर्यंत एकूण 59.80 टक्के एन्यूमरेशन फॉर्म (EFs) चे डिजिटायझेशन
पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यातील
चार विधानसभा मतदारसंघांमध्ये (अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया आणि आमगाव) एकूण
11 लाख 23 हजार 805 मतदारांचा समावेश असून, सर्व 1285 BLO मार्फत 100 टक्के फॉर्म
डाउनलोड व प्रिंटिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
यापैकी 97.34
टक्के फॉर्मचे वितरण करण्यात आले असून 6 लाख 72 हजार 79 फॉर्म डिजिटायझेशन झाले
आहेत, तर सुमारे 4 लाख 22 हजार फॉर्म अद्याप डिजिटायझेशनसाठी शिल्लक आहेत.
तालुकानिहाय
पाहता, आमगाव (ST) मतदारसंघात सर्वाधिक 68.02 टक्के डिजिटायझेशन झाले असून अर्जुनी
मोरगाव (65.86%) आणि तिरोडा (59.86%) हे त्यानंतर आहेत. गोंदिया मतदारसंघात मात्र
48.11 टक्के डिजिटायझेशन झाले आहे.
दरम्यान,
एकूण 5.52 टक्के फॉर्म अजूनही न मिळालेल्या (Uncollectable) स्वरूपात असून 2.64
टक्के प्रकरणांमध्ये विविध विसंगती (Anomalies) आढळून आल्या आहेत.
SIR-2026
मोहिमेअंतर्गत उर्वरित फॉर्म लवकरात लवकर जमा करून त्यांचे डिजिटायझेशन पूर्ण
करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
0000000
No comments:
Post a Comment