गोंदिया, दि.4 : जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांकडून
त्यांच्या प्रलंबित मागण्या
संदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्ता रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने
आयोजित केली जात आहेत. तसेच 10 सप्टेंबर रोजी पोळा, 11 सप्टेंबरला मारबत व 14 सप्टेंबर
रोजी गणेशोत्सव सण/उत्सव साजरे
करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा
व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना
प्राप्त अधिकाराअंतर्गत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियम क्रमांक 22 चे कलम 37 (1)
(3) अन्वये दिनांक 6 सप्टेंबर पासून ते 20 सप्टेंबर 2026
पर्यंत अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी जिल्ह्यात मनाई आदेश
लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर
फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
000000000
No comments:
Post a Comment