जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 21 July 2026

विशेष वृत्त... गोंदिया कृषी विभागाची ऊल्लेखनीय कामगिरी; हजारो शेतकऱ्यांना लाभ

 


        गोंदिया, दि.21 : वर्ष २०२५-२६ मध्ये गोंदिया कृषी विभागाने विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, यांत्रिकीकरण, अन्न प्रक्रिया उद्योग तसेच विविध कृषी योजनांमधून कोट्यवधी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना सुमारे ९८.९४ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली. तसेच पीक विमा योजनेअंतर्गत 38.50 कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे.

पीएम किसान व नमो शेतकरी योजनेद्वारे २,३१,६४४ शेतकऱ्यांना वर्षभरात २१५.९८ कोटी रुपये थेट खात्यात जमा करण्यात आले, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळाले आहे.

यांत्रिकीकरण योजनेत २५५२ लाभार्थ्यांना ३०.३४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, आधुनिक शेतीला चालना मिळाली आहे.

अन्न प्रक्रिया उद्योगातही जिल्ह्याने प्रगती केली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत १९६ लाभार्थ्यांना २.३८ कोटी रुपये अनुदान देण्यात आले. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेत ३२ लाभार्थ्यांना २६.२७ कोटी रुपये अनुदान देण्यात आले.

रब्बी क्षेत्रवाढ मोहिमेत मका ३७५८.८० हेक्टर आणि मोहरी ६७.६० हेक्टर  क्षेत्राची नोंद झाली आहे. तसेच महाविस्तार ॲपचा 31 टक्के शेतकऱ्यांनी वापर केल्यामुळे डिजिटल शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.

मका पिकाच्या क्षेत्रवाढीसाठी दरवर्षी ५६०० हेक्टरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पुढील तीन वर्षांत हे क्षेत्र १६८०० हेक्टरपर्यंत नेण्याचा मानस आहे. यासाठी ४० एफपीओंना अवजारे बँक उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या समन्वयातून साध्य झालेली ही कामगिरी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, आगामी काळातही अशाच योजनांद्वारे कृषी विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

                                                                0000000

No comments:

Post a Comment