जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 24 July 2026

3000 वृक्षारोपण मोहिमेला गती : श्रीराम समिती सदस्यांचा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सन्मान

 





3000 वृक्षारोपण मोहिमेला गती : श्रीराम समिती सदस्यांचा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सन्मान

गोंदिया, दि. 24 : नवीन प्रशासकीय इमारत परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल श्रीराम वृक्षारोपण आयोजन समितीच्या सदस्यांचा उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

नवीन प्रशासकीय इमारतीतील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात आयोजित छोटेखानी समारंभात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी तहसीलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक कैलाश गजभिये यांच्यासह समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर अग्रवाल, महामंत्री सुजित अग्रवाल, सचिव अपूर्व अग्रवाल उपस्थित होते.

श्रीराम वृक्षारोपण आयोजन समितीने हाती घेतलेली 3000 वृक्ष लागवडीची मोहिम ही पर्यावरण रक्षणासाठी एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून, त्याची सुरुवात नवीन प्रशासकीय इमारत परिसरातून करण्यात आली आहे.

उपस्थित मान्यवरांनी समितीच्या कार्याचे कौतुक करत पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment