गोंदिया, दि.9 : जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी झेनिथ चंद्र दोंतुला यांनी मंगळवारी सालेकसा तालुक्यातील
अतिदुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसाला आकस्मिक भेट देवुन आरोग्य संस्थेत देत
असलेल्या आरोग्य सेवा व सुविधांची पाहणी केली.
भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य
केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता, बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी)
दरम्यानच्या वेळेत मिळत असलेल्या रुग्ण सुविधा, प्रयोगशाळेत करण्यात येत असलेल्या
विविध चाचणींची माहिती, एनसीडी कार्यक्रम अंतर्गत मधुमेह व रक्तदाब रुग्णांची
माहिती, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन, पर्यवेक्षांनी
उपकेंद्रांना भेटी, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा, संस्था प्रसुती, औषधीसाठा,
किटकजन्य कार्यक्रम, साथरोग प्रतिबंधात्मक कार्यवाही, नियमित लसीकरण, अंगणवाडी
तपासणी, सॅम व मॅम बालकांची माहीती आदी बाबींचा आढावा घेवुन मुख्यालयी राहणे,
रुग्णसुविधा गुणवत्तापुर्वक देणे, पावसाळ्या दरम्यान कार्यक्षेत्रातील पुरग्रस्त
गावातील गरोदर मांताना गुंतागुंती होण्यापुर्वी ग्रामीण रुग्णालयात भरती करणे,
सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे करण्यात यावी,
कर्मचारी यांनी दौरा दैनंदिनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, आरोग्य संस्थाचे
रेकॉर्ड अद्यावत करुन मुख्यालयी राहण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
भेटी दरम्यान त्यांचेसोबत सालेकसा
पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय पुरी, सहाय्यक गटविकास अधिकारी सोनकुवर,
सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम, प्राथमिक आरोग्य केंद्र
दरेकसाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. पारस गिरी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी उन्नती
उप्पलवार यांचेसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे विपिन खापर्डे, सरिता पारधी,
सुंदराबाई भगत, पूजा बोलणे, दिपेश चव्हाण व आकाश बडोले तसेच इतर कर्मचारी उपस्थित
होते.
00000000
No comments:
Post a Comment