गोंदिया, दि.9 : ग्रामीण भागातील
नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने, 'माझं गाव आरोग्य
संपन्न गाव' मोहीम अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे
CPHC (Comprehensive Primary Health Care) प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत
गोल्हार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच
नेतृत्वाखाली हे विशेष प्रशिक्षण शिबीर पार पडले.
ग्रामीण स्तरावर आरोग्याचा दर्जा
सुधारण्यासाठी आणि दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा पुरविण्यासाठी फील्ड लेव्हलवर या
प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमुळे गाव पातळीवरील आरोग्य सेवा
अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्य
प्रशिक्षक म्हणून पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट डॉ. राजेश बेलंकार व जिल्हा बालरोग
स्पेशालिस्ट डॉ. सचिन उईके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षण नोडल अधिकारी
डॉ. खोब्रागडे, डॉ. पायल रहांगडाले, डॉ. सुवर्णा हुबेकर, अमित मंडल व वैद्यकीय
अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत
उत्तम आरोग्य सेवा पोहोचवणे हे आपले ध्येय आहे. या प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घेऊन
सर्व कर्मचाऱ्यांनी तळागाळातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करावी आणि मोहिमेला गती
द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी केले.
"माझं गाव आरोग्य संपन्न गाव"
मोहीम अंतर्गत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सुविधा पुरविण्यासाठी फील्ड लेव्हलवर
प्रशिक्षण देण्यात येत आहे. नागरिकांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी लोकसहभाग वाढवून
हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले
यांनी केले.
अभियानाची
प्रमुख वैशिष्ट्ये : ग्रामीण भागातील नागरिकांचा आरोग्याबाबतचा सहभाग वाढवणे. प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य
सुविधा मिळवून देणे. गाव पातळीवरील आरोग्य सेवा अधिक बळकट करणे. आयुष्मान भारत - CPHC अंतर्गत सेवांना
गती देणे व चालना देणे.
हा महत्त्वपूर्ण उपक्रम सार्वजनिक
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या
मार्गदर्शनाखाली तसेच प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन आणि आरोग्य
सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या सुनियंत्रणाखाली राज्यभर अधिक प्रभावीपणे
राबविण्यात येत आहे.
0000000
No comments:
Post a Comment