आमदार विनोदजी अग्रवाल यांचे पुढाकाराने
200 क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वितरण
गोंदिया, दि. 29 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व
स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंतीनिमित्त राज्यात दि.22ते 28 जुलै दरम्यान या
कालावधीत राज्यभर विविध आरोग्य विषयक उपक्रम राबविण्याबाबत शासना मार्फत
मार्गदर्शन सूचना प्राप्त झालेल्या आहेत.त्यानुसार आरोग्य संस्थेतील
कार्यक्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामपंचायत,जनआरोग्य समीती सभा अंतर्गत
विविध समाजोपोयोगी उपक्रम त्यात आरोग्य तपासणी,रक्तदान शिबीरे,वृक्षारोपण करण्यात
येत आहे.त्याचबरोबर प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय मित्र
बनून फूड बास्केटचे वितरण करण्यात येत आहे. दि.27 व 28 जुलै रोजी गोंदिया विधानसभा
क्षेत्रातील आमदार विनोदजी अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन गोंदिया तालुक्यातील 200
क्षयरुग्णाना फूड बास्केट वितरण करण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ.अभिजित गोल्हार यांच्या मार्गदर्शनात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव
यांच्या प्रत्यक्ष कार्यवाहीत गोंदिया तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व
उपकेंद्र येथील कार्यक्षेत्रातील 200
क्षयरुग्णाना फूड बास्केटचे वितरण करण्यात आले.त्याच बरोबर समाजातील इतर दानशूर
व्यक्तींनी समोर येऊन निक्षय मित्र बनून गोरगरीब क्षयरोगी रुग्णांना मदतीचा हात
देण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत
गोल्हार यांनी गोंदियावासियांना केले आले.
क्षयरोगाच्या रुग्णांसाठी
पौष्टिक 'फूड बास्केट' अतिशय महत्त्वाची असते. टीबीच्या औषधांमुळे रुग्णांची भूक
मंदावते आणि शरीरातील ऊर्जा कमी होते.सकस आहारामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते,
औषधांचे दुष्परिणाम कमी होतात, वजन स्थिर राहते आणि रुग्ण लवकर बरा होत असल्याची
माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.
क्षयरोग रुग्णांच्या
उपचारात आणि पुनर्प्राप्तीमध्ये 'फूड बास्केट' (पोषक आहाराचे किट) अत्यंत
महत्त्वाची भूमिका बजावते.चांगला व सकस आहार आजाराशी लढण्याची रोगप्रतिकार शक्ती
वाढवतो,औषधांचे दुष्परिणाम कमी करतो आणि रुग्णाचे वजन व ऊर्जा पूर्ववत करून त्याला
लवकरात लवकर बरे होण्यास मदत करत असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश
जाधव यांनी याप्रसंगी माहीती दिली आहे.
टीबी रुग्णांसाठी 'फूड
बास्केट'चे महत्त्व आणि फायदे:
·
रोगप्रतिकारशक्ती वाढवणे: टीबीच्या जंतूंशी लढण्यासाठी शरीराला उच्च दर्जाचे
प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. फूड बास्केटमधील कडधान्ये, शेंगदाणे,
अंडी व दूध यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती बळकट होते.
·
औषधांचे दुष्परिणाम कमी करणे: टीबीची औषधे खूप कडक असतात, ज्यामुळे मळमळणे,
भूक मंदावणे व थकवा येणे अशा समस्या उद्भवू शकतात. पौष्टिक आहारामुळे रुग्णाचा
अशक्तपणा दूर होतो.
·
वजन वाढवणे: टीबीमुळे रुग्णाचे वजन वेगाने कमी होते. आहारातील योग्य पोषण
तत्वांमुळे वजन नियंत्रित राहून रुग्ण लवकर बरा होतो.
·
उपचारात सातत्य: अनेक गरीब रुग्ण आर्थिक दुर्बलतेमुळे औषधांचा खर्च करू शकत
नाहीत किंवा उपाशीपोटी औषध घेऊ शकत नाहीत.फूड बास्केटमुळे रुग्णांना खात्रीशीर
अन्न मिळते, ज्यामुळे ते उपचारांमध्ये खंड न पाडता पूर्ण कोर्स करतात.
·
कुटुंबाला आर्थिक आधार: आजारपणामुळे रुग्ण काम करू शकत नसल्याने कुटुंबावर
आर्थिक संकट येते. फूड बास्केटमुळे कुटुंबाची अन्नाची गरज पूर्ण होऊन मोठा मानसिक
व आर्थिक भार कमी होतो.
00000
No comments:
Post a Comment