गोंदिया,
दि.20 : वेठबिगारांना वेठबिगारीतून मुक्त करुन त्यांचे पुर्नवसन करण्याच्या
दृष्टीने केंद्र शासनाने वेठबिगार पध्दत (निर्मुलन) अधिनियम-१९७६ लागू केलेला आहे.
वेठबिगार कामगार म्हणजे 'आपले इच्छेविरुद्ध वेठबिगारी करणारा पुरुष/स्त्री अथवा
बालकामगार अथवा वेठीस धरलेला व बिगारी कामे करणारा. सहसा, अशा व्यक्तीने स्वतः
अथवा त्याचे जवळचे नातेवाईकाने (आई, वडिल, भाऊ इत्यादी), उधार अथवा अग्रीम म्हणून
रक्कम अथवा वस्तू घेतलेली असते. ती रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, त्याला
अथवा त्याचे संपूर्ण कुटुंबाला, त्या रकमेची परतफेड म्हणून, आवश्यक पूर्तता
होईपर्यंत श्रम मजूरी अथवा सांगितलेली कामे करावी लागत असून वेठबिगारास आपले इच्छेविरुद्ध
काम करावे लागते.'
हा
कायदा मोडणाऱ्या मालकाला/व्यक्तीला 3 वर्षापर्यंतचा कारावास आणि 2000 रुपयांपर्यंत
दंडाची तरतूद आहे. तसेच वेठबिगार कामगार पद्धती (निर्मूलन) अधिनियम १९७६ च्या
प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने १४ मे २०२६ रोजी जारी केलेल्या सुधारीत
मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure -SOP) प्रकाशित केलेली असून
त्याची अंमलबजावणी करण्याकरीता महसूल व कामगार विभागाव्दारे प्रचार प्रसार करण्यात
येत आहे.
गोंदिया
जिल्हयात वरीलप्रमाणे वेठबिगार कामगार कामावर ठेवल्याचे आढळल्यास जिल्हयातील
कामगारांनी/नागरिकांनी/समाज सेवी संस्थेने जिल्हाधिकारी गोंदिया, स्थानिक पोलिस
स्टेशन, जिल्हयातील उपविभागिय अधिकारी तसेच सहायक कामगार आयुक्त गोंदिया यांचेकडे
प्रत्यक्षात, पोष्टाव्दारे किंवा aclgnd@gmail.com या ई-मेलवर तक्रार करण्यात यावी,
असे आवाहन सहायक कामगार आयुक्त, गोंदिया यांनी केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment