गोंदिया शहरात नझुल भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणासाठी विशेष
शिबिर
१ ऑगस्टला अर्ज
सादर करण्याचे आवाहन
गोंदिया, दि.२९ : मौजा गोंदिया
येथील नझुल शीट क्रमांक १ ते ३२ मधील सर्व भाडेपट्टाधारकांसाठी महत्त्वाची बातमी
आहे. गोंदिया शहरात एकूण २,४९५ मालमत्ता भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या असून,
त्यापैकी शिल्लक राहिलेल्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण तसेच वर्ग–१ (फ्री होल्ड)
करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महसूल व वन विभागाच्या शासन
निर्णय क्रमांक जमीन २४९९/प्र.क्र./१२५/ज-८ दिनांक २३ डिसेंबर २०१५ तसेच शासन
निर्णय क्रमांक नझुल २०१६/प्र.क्र./१८६(अ) ज-८ दिनांक २ मार्च २०१९ नुसार सन २०१०
ते २०४० या कालावधीसाठी भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण व फ्री होल्ड प्रक्रिया खासदार
राजेंद्र जैन आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे.
याअंतर्गत, उर्वरित
भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण व वर्ग–१ (फ्री होल्ड) करण्यासाठी दिनांक १ ऑगस्ट २०२६
रोजी सकाळी १० वाजल्यापासून जलाराम लॉन, फुलचुर, गोंदिया येथे विशेष शिबिर आयोजित
करण्यात आले आहे. सर्व भाडेपट्टाधारकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आवश्यक
कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा नझुल अधिकारी,
गोंदिया यांनी केले आहे.
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
आहेत :
१) अर्ज
२) आखीव पत्रिका
३) प्रमाणित नकाशा
४) सन १९५२-५३ चा प्रमाणित खसरा
५) जुन्या पट्ट्याची प्रत
(उपलब्ध नसल्यास ₹१०० चा हलफनामा)
६) खरेदी खत
७) वाणिज्य वापर असल्यास स्थानिक
नियोजन प्राधिकरणाची मान्यता (नमुना ७५, गुमास्ता, बांधकाम नकाशा इ.)
८) चालू वर्षाची नगर परिषद कर
पावती
९) भाडेपट्टाधारक मृत असल्यास
मृत्यू प्रमाणपत्र व वारसांसाठी ₹१०० स्टॅम्पवरील प्रतिज्ञापत्र
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,
शिल्लक भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण आणि फ्री होल्ड प्रक्रियेसाठी नागरिकांनी मोठ्या
संख्येने उपस्थित राहून अर्ज सादर करावेत, जेणेकरून प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊ
शकेल.
00000
No comments:
Post a Comment