गोंदिया, दि.3 : ‘न्यायप्रक्रियेत सहभाग’ आणि ‘न्याय आपल्या दारी’ या
संकल्पनेला मूर्त रुप देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘समाधान समारोह’ या
उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा 21 एप्रिल 2026 पासून प्रारंभ झालेला असून
दि.21, 22 व 23 ऑगस्ट 2026 रोजी विशेष लोक अदालतीमध्ये समारोप होणार आहे.
सदर विशेष लोक अदालतीचा
उद्देश हा सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती-आधारित निराकरण
प्रक्रियेद्वारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. यामध्ये सर्व वकील, पक्षकार आणि
संबंधित हितधारकांना या उपक्रमात सक्रीय सहभाग घेण्याचे आणि वादांचे प्रभावी
निवारण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सदर प्रक्रियेत
प्रत्यक्ष किंवा आभासी पध्दतीने (ऑनलाईन) पक्षकार उपस्थित राहू शकतात.
यासाठी https://forms.gle/jqxefqF4BCWzukoP6 या गुगल लिंकवर गुगल फॉर्मद्वारे पक्षकार आणि त्यांचे वकील आपला अर्ज सादर
करु शकतील. यामध्ये सहभागी होण्यासाठी सदर अर्ज https://www.sci.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध
आहे.
अधिक माहितीसाठी जवळच्या
विधी सेवा प्राधिकरण अथवा तालुका विधी सेवा समिती यांचेशी संपर्क साधावा. असे
सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांनी कळविले आहे.
00000000
No comments:
Post a Comment