जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 20 July 2026

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत रोईंग व कुस्ती खेळांच्या विभागीय निवड चाचणीचे आयोजन

 


          गोंदिया, दि.20 : मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत रोईंग व कुस्ती खेळांच्या विभागीय निवड चाचणीचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत पुणे विभागामार्फत रोईंग व कुस्ती या खेळांसाठी विभागीय स्तरावरील निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील पात्र व इच्छुक खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी केले आहे.

        रोईंग निवड चाचणी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता क्रीडा संकुल, एमआईटी एडीटी विद्यापीठ, लोणी काळभोर, पुणे येथे होणार आहे. तर कुस्ती निवड चाचणी 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर, माळेगाव (बारामती रोड), पुणे येथे होणार आहे.

        निवड चाचणीसाठी उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंनी जन्मतारीख प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील सात वर्षातील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच संबंधित खेळासाठी आवश्यक साहित्य सोबत आणावे.

        गोंदिया जिल्ह्यातील सर्व पात्र खेळाडूंनी मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत आयोजित या निवड चाचणीमध्ये सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment