जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 13 July 2026

शिरपूर बांध येथे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कामाचा आढावा : गुणवत्तापूर्ण व जलद काम करण्याचे उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय अवधाने यांचे निर्देश

 



        गोंदिया, दि.13 : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत शिरपूर बांध (ता. देवरी) येथे शनिवारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांनी बीएलओ सहाय्यकांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या तसेच काम जलद गतीने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय अवधाने यांनी निर्देश दिले.

          या पाहणीदरम्यान अपर तहसीलदार चिचगड नवनाथ कातकडे तसेच तहसीलदार देवरी धनंजय देशमुख उपस्थित होते. श्री. अवधाने यांनी बीएलओ सहाय्यकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या कामातील अडचणी जाणून घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले.

         विशेष म्हणजे, दूर ग्रामीण भागातील बीएलओ सहाय्यक सुद्धा SIR कामात उत्साहाने सहभागी झालेले दिसून आले. हे सहाय्यक स्थानिक गावातील असल्याने गावातील मतदारांशी त्यांचा सहज संपर्क होत असून काम प्रभावीपणे पार पडत आहे. त्यामुळे मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला गती मिळत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

                                                                              0000000

No comments:

Post a Comment