गोंदिया, दि.27 : राज्य
शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६” अंतर्गत गोंदिया
जिल्ह्यात कामकाजाला गती मिळत असून विविध टप्प्यांवर लक्षणीय प्रगती झाल्याचे
दिसून येत आहे. सोमवारपर्यंत ५,१४९ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे.
जिल्हा स्तरावरील
डॅशबोर्डनुसार आतापर्यंत एकूण ३०,२९५ कर्जखाते अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी
२१,६१६ शेतकरी पात्र ठरले असून, त्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
योजनेच्या प्रक्रियेत
अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) टप्प्यात सध्या ५,१४९
शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, तर अजूनही १६,४६७ शेतकऱ्यांची ई-केवायसी
प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.
प्रशासनाने प्रलंबित
ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
संबंधित बँका, सहकारी संस्था आणि महसूल यंत्रणा यांच्या समन्वयातून ही प्रक्रिया
गतीमान करण्यात येत आहे.
पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ
आपले आधार प्रमाणीकरण (E-KYC) पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा
प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून,
गोंदिया जिल्हा कर्जमुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.
00000000
No comments:
Post a Comment