गोंदिया, दि.10 : जिल्ह्यात 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. स्थापित सार्वजनिक तसेच खाजगी गणेश मुर्ती विसर्जन पाचवा दिवस 18 सप्टेंबर, सातवा दिवस 20 सप्टेंबर, आठवा दिवस 21 सप्टेंबर, नववा दिवस 22 सप्टेंबर, दहावा दिवस 23 सप्टेंबर तसेच अनंत चतुर्थी दिवस 25 सप्टेंबर या दिवशी मोठ्या संख्येने गणेश मुर्तीचे विसर्जन होणार आहे.
गोंदिया शहरातील छोटा गोंदिया तलाव, भिमघाट पांगोली नदी, पिंडकेपार नाला, सरकारी तलाव (रेल्वे), मुर्री तलाव. गोंदिया ग्रामीण खमारी तलाव, टेमणी घाट (पांगोली नदी). रामनगर भागातील बांधतलाव सुर्याटोला, हिवरा गाव तलाव, टेमनी नदी घाट. रावणवाडी क्षेत्रातील कोरणी रजेगाव नदी घाट. आमगाव भागातील संत तुकडोजी तलाव, गायत्री मंदिर तलाव, बाघ नदी घाट. गोरेगाव क्षेत्रातील पवन तलाव, पांगोली नदी घाट. सालेकसा भागातील रोंढा नाला, साखरीटोला गाव नाला. देवरी क्षेत्रातील धुकेश्वरी मंदिर तलाव-गाव तलाव. डुग्गीपार भागातील चुलबंद नदी घाट-गाव तलाव. अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील महागाव तलाव, अर्जुनी मोरगाव-गाव तलाव. नवेगावबांध क्षेत्रातील नवेगावबांध तलाव. तिरोडा भागातील शिंगाडा तलाव, काशीघाट (गराडाटोला), खामतलाव, गिरजाबाई शाळेजवळील तलाव. गंगाझरी क्षेत्रातील कवलेवाडा, पांगळी, मुंडीपार, एकोडी तलाव याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची तसेच लहान मुलांची गर्दी होण्याची शक्यता असून विसर्जन सायंकाळी व रात्रीचे वेळी होत असल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी विद्युत प्रकाशाची व बॅरिकेट्सची व्यवस्था करण्यात यावी. तसेच बोधचिन्ह, सूचना फलक सुध्दा लावण्यात यावे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही व क्रेनची व्यवस्था करण्यात यावी. असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment