गोंदिया, दि.10 : महाराष्ट्र शासन
राजपत्र, सामान्य प्रशासन विभागाच्या दि.5 डिसेंबर 2025 च्या अधिसुचनेनुसार व दि.3
फेब्रुवारी 2026 च्या पत्रानुसार 11 सप्टेंबर रोजी तान्हा पोळा निमित्त संपूर्ण
गोंदिया जिल्ह्याकरीता सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सदर सार्वजनिक
सुट्टी लक्षात घेता, आरोग्य संस्थेअंतर्गत कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय
(केटीएस) व बाई गंगाबाई स्त्री रुगणालय शुक्रवार दि.11 सप्टेंबरला तान्हा पोळा निमित्त
बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार आहे. दिनांक 12 व 13 सप्टेंबर रोजी बाह्यरुग्ण विभाग
नेहमीप्रमाणे सुरु राहणार. तर 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी निमित्त बाह्यरुग्ण
विभाग बंद राहणार असून दि.15 सप्टेंबर रोजी बाह्यरुग्ण विभाग नेहमीप्रमाणे सुरु
राहणार आहे. असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुगणालयाचे वैद्यकीय अधीक्षक
डॉ.दिगांबर मरसकोल्हे यांनी कळविले आहे.
00000000
No comments:
Post a Comment