जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 10 September 2026

मतदार यादी निरीक्षक वियजलक्ष्मी बिदरी 17 सप्टेंबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 


       गोंदिया, दि.10 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारुप मतदार यादीवरील दावे व हरकतींच्या कालावधीत मतदार यादीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने त्या गुरुवार दि.17 सप्टेंबर 2026 रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

         दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीवरील आक्षेप व हरकतींच्या कालावधीत मतदार यादी निरीक्षक गोंदिया जिल्ह्यात तीन भेटी देणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्या पहिली भेट दि.17 सप्टेंबरला देणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दुपारी 1.00 वाजता लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मतदार यादी पुनरीक्षणाचे काम पारदर्शक आणि अचूक व्हावे या दृष्टीने या बैठकीत महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करुन आढावा घेतला जाणार आहे.

    जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी व अनुपस्थित/मयत/स्थलांतरीत/दुबार मतदारांची यादी जिल्ह्याच्या https://gondia.gov.in/en/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

          मतदारांना त्यांच्या कोणत्याही अडचणी/तक्रारी करीता मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे मतदार मदत केंद्र क्रमांक 63-अर्जुनी मोरगाव- 07196-220147, 64-तिरोडा- 07198-299020, 65-गोंदिया- 07182-236703 व 66-आमगाव- 07199-295296 आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदार मदत केंद्र क्रमांक 07182-236148 यावर 24 बाय 7 संपर्क करता येईल. असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांनी कळविले आहे.

                                                             00000000

         

No comments:

Post a Comment