गोंदिया, दि.10 : गोंदिया जिल्ह्याला अधिक 461 ‘आपले सरकार सेवा केंद्र' येत्या काळात मिळणार. निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी कळविलेल्या पत्रकानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या १९ जानेवारी २०१८, २७ मार्च २०२५, २ जून २०२६ आणि ९ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयांच्या अनुषंगाने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आपले सरकार सेवा केंद्र सुरू होणार आहेत.
जिल्ह्यात दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या सेवा केंद्रांमुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा मिळविताना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या केंद्रांचे वाटप झाल्यानंतर ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
यासोबतच, नवीन ४६१ सेवा केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले असून, शासनाच्या नियमानुसार पुढील निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
0000000
No comments:
Post a Comment