जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 8 September 2026

तिरोडा तालुक्यातील सरपंच पदाची सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुधारित आरक्षण सोडत आज

 


         गोंदिया, दि.8 : जिल्हाधिकारी, गोंदिया यांचे दि.7 सप्टेंबर 2026 च्या अधिसुचनेनुसार तिरोडा तालुक्यातील सन 2025 ते 2030 या कालावधीकरीता 93 ग्रामपंचायती पैकी 49 ग्रामपंचायतीची सरपंच पदाकरीता सुधारित सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करावयाचे असून त्याकरीता बुधवार दि.9 सप्टेंबर 2026 रोजी पंचायत समिती सभागृह, तिरोडा येथे सकाळी 11 वाजता आरक्षणाची सोडत होणार आहे. तरी तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिकांनी आरक्षण सोडतीकरीता उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसिदार तिरोडा यांनी केले आहे.

                                                                  0000000

No comments:

Post a Comment