जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 3 July 2026

दुग्ध व हॉटेल व्यावसायिकांसाठी विशेष समुपदेशन बैठक 7 जुलैला

 


      गोंदिया, दि.3 : जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व भेसळमुक्त दुधाचा पुरवठा व्हावा, याकरिता जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्या निर्णयानुसार प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणून, दूध भेसळ समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व दुग्ध व हॉटेल व्यावसायिकांसाठी एका विशेष समुपदेशन बैठकीचे आयोजन दि.7 जुलै 2026 रोजी दुपारी 3 ते 4.30 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिल्या मजल्यावर समिती कक्ष येथे करण्यात आले आहे.

          सदर बैठकीत अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत परवान्यांच्या अटी व शर्ती, खरेदी-विक्रीच्या विहित नोंदी ठेवणे (रजिस्टर्स), अस्वच्छतेबाबत शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे, तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणाऱ्या दंडात्मक व फौजदारी तरतुदींबाबत सविस्तर कायदेशीर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

           सदर समुपदेशन बैठकीनंतर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात सर्व विभागाच्या संयुक्त समन्वयाने कोणतीही पूर्वकल्पना न देता व्यापक धडक तपासणी मोहिम सुरु करण्यात येणार आहे. भविष्यातील कायदेशीर पेच, व्यवसाय बंदी आणि कायदेशीर कारवाई टाळण्याच्या दृष्टीने या बैठकीला सर्व संबंधित घटकांची उपस्थिती अनिवार्य आहे, याची नोंद घ्यावी. असे पदावधित अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) अमृता शिर्के यांनी कळविले आहे.

                                                              0000000

No comments:

Post a Comment