जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 3 July 2026

विशेष लोक अदालतीचे आयोजन 18 जुलै व 21 नोव्हेंबरला

 


      गोंदिया, दि.3 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील उच्च न्यायालय (सर्व खंडपीठासह), सर्व जिल्हा व तालुका न्यायालये येथे निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्टस ॲक्टच्या कलम 138 अंतर्गत प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व वाद प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरीता ‘विशेष लोक अदालतीचे’ आयोजन दि.18 जुलै व 21 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे.

        न्यायालयात प्रलंबित असलेली निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्टस ॲक्टच्या कलम 138 अंतर्गतची प्रकरणे विशेष लोक अदालतीमध्ये समझोत्याने निपटारा करण्याकरीता आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजीकच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा आणि विशेष लोक अदालतीमध्ये आपल्या प्रकरणांचा सामंजस्याने व तडजोडीने निपटारा करावा. गोंदिया जिल्ह्यासाठी 8591903935 या क्रमांकावरही संपर्क करुन माहिती मिळवू शकता. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांनी कळविले आहे.

00000000

No comments:

Post a Comment