गोंदिया, दि.16 : मतदार यादी विशेष
संक्षिप्त पुनरावलोकन (SIR) मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्रिय झाले
असून आज जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व राजकीय
पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत
मोहिमेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत सहकार्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की,
जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 48 टक्के डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. एसआयआर
(SIR) प्रक्रियेची सविस्तर माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.
तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या कामकाजाबाबतही मार्गदर्शन करण्यात
आले.
यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना
येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यावर चर्चा करण्यात आली. तसेच ‘FAQ’ (नेहमी विचारले
जाणारे प्रश्न) संदर्भातील माहिती पुस्तिका निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून
सर्वांना वितरित करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने सर्व राजकीय पक्षांनी
सक्रिय सहकार्य करावे आणि नागरिकांनी आवश्यक माहिती वेळेत सादर करून मतदार यादी
अद्ययावत करण्यास हातभार लावावा, असे आवाहन केले.
0000000
No comments:
Post a Comment