जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 3 July 2026

शेतकऱ्यांनी फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन

 



      गोंदिया, दि.3 : महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली आहे. या योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांचे जे कर्ज आहेत ते माफ होणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत सर्व पात्र शेतकऱ्यांची माहिती घेणे सुरु आहे आणि त्यानुसारच शासनाच्या निकषात बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात येईल, अशी शासनाने योजना आखली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवू, असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.

          शासनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अचूक माहिती उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन या योजनेमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यास मदत होईल. यामुळे कर्जमुक्तीच्या प्रक्रियेला गती मिळून शेतकऱ्यांवरच्या कर्जाचे ओझे कमी करता येईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी सदर योजनेसंदर्भात शासनाला योग्य माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment