गोंदिया, दि.8 : केंद्र सरकारच्या PM
YASASVI (प्रधानमंत्री यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रेट
इंडिया) अंतर्गत Top Class Education in School या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली
असून, पात्र विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर (NSP) अर्ज करण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील नामांकित (Top
Class) शाळांमध्ये शिकणाऱ्या इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास (EBC)
आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) या प्रवर्गातील इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या
पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
महत्त्वाच्या
अटी व पात्रता : विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सर्व मागांनी
मिळून १२.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
नूतनीकरण
: ज्या विद्यार्थ्यांनी सन 2025-26 मध्ये इयत्ता 9 वी किंवा 11 वी मध्ये असताना या
योजनेसाठी अर्ज केला होता, त्यांनी सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आपल्या
अर्जाचे नूतनीकरण (Renewal) करणे बंधनकारक आहे.
अर्ज
करण्याची पद्धत व आवश्यक कागदपत्रे : इच्छुक विद्याथ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप
पोर्टलच्या अधिकृत वेबसाईट scholarships.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
अर्ज भरताना पुढील प्रमाणे कागदपत्रे
अपलोड करावी लागतील. जात प्रमाणपत्र (Caste Certificate), उत्पन्न प्रमाणपत्र
(Income Certificate २.५ लाखांपर्यंत), मागील इयत्तेचे गुणपत्रक (Marksheet),
शाळेचा दाखला/ प्रवेश प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत (विद्यार्थी
किंवा पालकांच्या नावावर), पासपोर्ट साईज फोटो,
या योजनेकरीता ऑनलाईन अर्ज 1 जून 2026
पासून सुरु झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026
आहे. शाळांकडून अर्ज पडताळणी करण्याची तारीख 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे.
सदर योजना निवडक
शाळा/महाविद्यालयांकरीता असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापुर्वी योजना लागू
असल्याची खात्री शाळेचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांचेमार्फत करावी व अर्ज सादर
केल्यानंतर संबंधित शाळेच्या इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर कडून आपला अर्ज ऑनलाईन
पडताळला (Verify) गेला आहे की नाही, याची खात्री करावी. अधिक माहितीसाठी
विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा. असे इतर मागास
बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सविता किर्तीकर यांनी कळविले आहे.
00000000
No comments:
Post a Comment