गोंदिया, दि.8 : जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी झेनिथ चन्द्र दोन्तुला यांनी मंगळवारी सालेकसा तालुक्यातील
प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांधला आकस्मिक भेट देवुन आरोग्य संस्थेत देत
असलेल्या आरोग्य सेवा व सुविधाची पाहणी केली.
भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची
स्वच्छता, बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत मिळत असलेल्या रुग्ण सुविधा,
प्रयोगशाळेत करण्यात येत असलेल्या विविध चाचणींची माहीती, एनसीडी कार्यक्रम
अंतर्गत मधुमेह व रक्तदाब रुग्णांची माहीती, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे नियमित
गावनिहाय भेटीचे नियोजन, पर्यवेक्षांचे उपकेंद्रांना भेटी, राष्ट्रीय आरोग्य
कार्यक्रमांचा आढावा, औषधी साठा, शासकिय निवास्थान आदी विविध बाबींचा आढावा घेवुन
मुख्यालयी राहणे, रुग्णसुविधा गुणवत्तापुर्वक देणे, सद्यस्थितीत पावसाळ्या दरम्यान
कार्यक्षेत्रातील नदीकिनारी असलेले पुरग्रस्त गावातील गरोदर मांताना गुंतागुंती
होण्यापुर्वी ग्रामीण रुग्णालयात भरती करणे, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची
अंमलबजावणी चांगल्याप्रकारे करण्यात यावी, कर्मचारी यांनी दौरा दैनंदिनी नियमांचे
काटेकोरपणे पालन करावे, आरोग्य संस्थाचे रेकॉर्ड अद्यावत करुन मुख्यालयी
राहण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांधचे वैद्यकिय अधिकारी
डॉ.सुषमा देशमुख, आरोग्य सहाय्यक प्रदीप कटरे व राठोड, फार्मासिस्ट संजय गुप्ता, प्रयोगशाळा
वैज्ञानिक अधिकारी सुरेश पारधी, महालॅबचे ज्योती दमाहे, आरोग्य सहायिका मनिषा
मेश्राम व संगिता बागडे, आरोग्य सेविका स्वाती टापरे, स्टाफ नर्स मोहन गिरी, समुदाय
आरोग्य अधिकारी जिना बघेले, कनिष्ठ सहाय्यक उमेश राऊत, परिचर हेमंत भैरव व बिसेन,
सफाईगार ज्योती शेंदरे व ज्योती शिवणकर यांचेसह आरोग्य संस्थेचे इतर उपस्थित होते.
00000000
No comments:
Post a Comment