गोंदिया,
24: राष्ट्रभक्ती, नेतृत्वगुण आणि इतिहासाची जाणीव नव्या पिढीत रुजविण्यासाठी
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्या वतीने राज्यस्तरीय 'थोरले
बाजीराव पेशवे पराक्रम दिन 2026'
राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे
या
राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांपासून युवक, शिक्षक, साहित्यप्रेमी, कलाकार
आणि इतिहास अभ्यासकांपर्यंत सर्वांना सहभागी होण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध
करून देण्यात आली आहे.
स्पर्धांमध्ये
निबंध, वक्तृत्व, रील (Reel) निर्मिती, काव्यलेखन आणि नाट्यसंहिता लेखन अशा विविध
प्रकारांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धांचे विषय थोरले बाजीराव पेशवे यांच्या
जीवनकार्य, पराक्रम, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठा याभोवती केंद्रित असणार आहेत.
स्पर्धेसाठी
1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशिका व साहित्य
सादर करता येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर ‘पराक्रम दिन’ साजरा केला जाणार
असून, 27 ऑगस्ट 2026 (रक्षाबंधन) रोजी राज्यस्तरीय स्पर्धांचे निकाल जाहीर केले
जाणार आहेत.
अमृतच्या
गोंदिया जिल्हा कार्यालयामार्फत सर्व विद्यार्थी, युवक-युवती, शिक्षक आणि
इतिहासप्रेमींना या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले
आहे. हा उपक्रम केवळ स्पर्धा नसून नव्या पिढीमध्ये प्रेरणादायी इतिहासाची जाणीव
आणि राष्ट्रप्रेम जागविणारी एक महत्त्वाची चळवळ ठरणार आहे.
0000000
No comments:
Post a Comment