गोंदिया, दि.2 : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या
कोअर क्षेत्रातील जंगल सफारी व पर्यटन संकुल 1 जुलै 2026 पासून पुढील आदेशापर्यंत
बंद करण्यात आले आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पर्यटन गेट व
पर्यटन संकुल नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक
पियुषा जगताप यांनी दिली.
यापूर्वी वनविभागाने कोअर क्षेत्रातील पर्यटन
गेट व पर्यटन संकुल 15 जून ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश
दिले होते. त्यानुसार 16 जून 2026 पासून ऑफलाईन व वेबसाईटवर ऑनलाईन आरक्षण सुविधा
बंद करण्याचे आदेशही जारी करण्यात आले होते.
मात्र, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी सुधारित
आदेश जारी करून 15 जून एैवजी 30 जून 2026 पर्यंत पर्यटन सुरू ठेवण्यास मान्यता
दिली होती. त्यानुसार कोअर क्षेत्रातील पर्यटन 30 जून 2026 पर्यंत सुरु ठेवण्यात
आले होते.
दरवर्षीप्रमाणे संरक्षित क्षेत्रातील पावसाळी
हंगामात निसर्ग पर्यटनासंदर्भातील मार्गदर्शक सूचनानुसार कोअर क्षेत्रातील जंगल
सफारी व पर्यटन संकुल 1 जुलै 2026 पासून पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे.
तथापि, बफर क्षेत्रातील पर्यटन गेट व पर्यटन संकुल बंद करण्यात येणार नाही, याची पर्यटकांनी
नोंद घ्यावी, असे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्राच्या उपवनसंरक्षक तथा
क्षेत्रसंचालक पियुषा जगताप यांनी कळविले आहे.
00000000
No comments:
Post a Comment