गुरुपौर्णिमेनिमित्त देवरीतील मनोहर भाई पटेल
प्राथमिक शाळेत जनजागृती कार्यक्रम
गोंदिया दि. 30 :
गुरुपौर्णिमेनिमित्त देवरी येथील मनोहर भाई पटेल प्राथमिक शाळेत बालकांच्या कायदे
व अधिकारांविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन
गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमात बालकांवर
होणारे अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श याबाबतची
माहिती, चाइल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098, बालविवाह व बालकामगार विषयक
कायदे, मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम, सोशल मीडियापासून दूर राहून मानसिक
आरोग्य जपण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दत्तक प्रक्रिया,
अनाथ प्रमाणपत्र, शासकीय योजना व व्यसनाधीनतेची कारणे आणि त्यावरील उपाय यावरही
सविस्तर माहिती देण्यात आली. बाल संरक्षण कक्षाच्या समुपदेशक मनिषा मोहुर्ले यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे
मुख्याध्यापक व्ही. एस. गेडाम यांच्या उपस्थितीत व्यासपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. काही
विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक व्ही. एस. गेडाम यांनी केली.
No comments:
Post a Comment