जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 16 July 2026

राज्यस्तरीय ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

 


          गोंदिया, दि.16 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य घेवून यशस्वीपणे उद्योग उभारणी करून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध केलेल्या मंडळाच्या यशस्वी उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व त्यांचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी दि.13 जुलै 2026 पासून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यस्तरीय ग्रामोद्योग भरारी पुरस्कार २०२६ करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

          महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार २०२६" साठी नामांकने मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने ही पुरस्कार योजना सुरु केली आहे.

         यावर्षी या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे. सदर पुरस्कार योजनेत प्रथम, व्दितीय व तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येतात व काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. संकल्पनेतुन उद्योगाच्या वृध्दीसाठी व उद्योगाला चालना व गती देण्यासाठी सन २०२३ पासून राज्यस्तरीय "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार" सुरु करून या माध्यमातून प्रथम, व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येत आहेत.

         नामांकन अर्ज मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावर तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज दि.२८ जुलै २०२६ पूर्वी जिल्हा कार्यालयात पाठवावेत.

         अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय गोंदिया, शितला माता मंदिर जवळ, कापसे बिल्डींग, सिव्हील लाईन, गोंदिया येथे प्रत्यक्ष अथवा उद्योग पर्यवेक्षक नितीन नेवारे मो. 09765622268

यावर संपर्क साधावा. असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे.

0000000

No comments:

Post a Comment