गोंदिया, दि.16 : विशेष संक्षिप्त
पुनरावलोकन (SIR) मोहिमेत गोंदिया जिल्ह्यात लक्षणीय प्रगती होत असून १६ जुलै २०२६
रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या अहवालानुसार मतदार नोंदणी प्रक्रियेला वेग आला आहे.
जिल्ह्यातील एकूण सुमारे ११.२३ लाख मतदारांपैकी १०.८७ लाखांहून अधिक इन्यूमरेशन
फॉर्म (Enumeration Forms (EF) वितरित करण्यात आले असून वितरणाची टक्केवारी 96.78
इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील 1285 बीएलओ (BLO) मार्फत ही
मोहीम राबवली जात असून सर्व भागांमध्ये जवळपास 100 टक्के फॉर्म पोहोचविण्याचे काम
पूर्णत्वाकडे आहे. आतापर्यंत सुमारे 5,46,745 फॉर्म डिजिटाईज करण्यात आले असून हे
प्रमाण 48.65 टक्के आहे. तर 5,61,062 फॉर्म अद्याप डिजिटायझेशन प्रक्रियेत
प्रलंबित आहेत.
फॉर्म सादर करण्याबाबतही चांगली प्रगती
दिसून येत असून 5,46,585 फॉर्म (48.64%) प्राप्त झाले आहेत. याशिवाय मतदार यादीत
3,119 (0.28%) मतदारांबाबत विसंगती आढळून आली आहे. सुमारे 15,998 फॉर्म (1.42%)
अजूनही न जमा झाल्याचे दिसून येते.
तालुकानिहाय पाहता काही विधानसभा
क्षेत्रांनी आघाडी घेतली असून देवरी आणि अर्जुनी मोरगाव भागात वितरण आणि संकलनाचे
प्रमाण समाधानकारक आहे. जिल्हा प्रशासनाने बीएलओ (BLO) व सहाय्यकांना काम जलद व
अचूक पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात
आले आहे की, आपला इन्यूमरेशन फॉर्म (Enumeration Form) वेळेत भरून सादर करावा,
जेणेकरून मतदार यादी अचूक व अद्ययावत राहील.
0000000
No comments:
Post a Comment