गोंदियात ‘नशा मुक्त युवा विकास भारत’ उपक्रमाला
उत्स्फूर्त प्रतिसाद
गोंदिया, दि. 30: युवा
कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या ‘मेरा युवा भारत’ गोंदिया
यांच्या वतीने जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त युवा विकास भारत’ (व्यसनमुक्त युवा विकास
भारत) या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन गोंदिया येथील एनएमडी महाविद्यालयात
करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी एनएमडी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. रवींद्र मोहतुरे हे प्रमुख
पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना
व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. “देशाच्या प्रगतीसाठी युवकांची
भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, व्यसनमुक्त भारत घडवण्यासाठी प्रत्येक युवकाने
जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असे ते म्हणाले.
मेरा युवा भारत गोंदियाचे
उपसंचालक सौरभ निषाद यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करताना सांगितले की, या
उपक्रमाचा उद्देश युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे आणि त्यांना
सकारात्मक दिशेने प्रेरित करणे हा आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेनंतर राज्य आणि
राष्ट्रीय स्तरावरही या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी
दिली.
या कार्यक्रमांतर्गत
नृत्य, संगीत, पथनाट्य, चित्रकला आणि भाषण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले
होते. या स्पर्धांमधून युवकांनी व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडला.
विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
एकूणच, ‘नशा मुक्त युवा
विकास भारत’ हा उपक्रम युवकांमध्ये सकारात्मक विचार रुजवणारा आणि समाजात
व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवणारा ठरला.
00000
No comments:
Post a Comment