जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 14 July 2026

महिला लोकशाही दिनाचे आयोजन 20 जुलैला

 


       गोंदिया, दि.14 : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. महिलांच्या कोणत्याही विभागाशी संबंधित समस्या, वैयक्तीक समस्या, गाऱ्हाणी व अडीअडचणी एैकून घेण्यासाठी दि.20 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

        या लोकशाही दिनामध्ये सर्व महिला कर्मचारी, महिला मंडळ, बचतगट व इतर महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था येथील महिला थेट सभेमध्ये येवून वैयक्तीक तक्रार नोंदवू शकतात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमून्यात नसणारे व आवश्यक कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार/निवेदने वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर ते अर्ज स्विकारण्यात येणार नाही.

         तरी सर्व पिडीत महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात व्यक्तीश: येऊन आपली तक्रार तीन प्रतीत सादर करावी. अर्जाचा नमूना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, खोली क्र.36, जयस्तंभ चौक, गोंदिया या कार्यालयात नि:शुल्क प्राप्त होईल.

         तालुका स्तरावर दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.  त्यासाठी संबंधित तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) यांच्याकडे अर्ज सादर करावे. अर्जाचा नमूना बाल विकास अधिकारी यांचेकडे नि:शुल्क प्राप्त होईल. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गोदिया येथे संपर्क साधावा.

                                                                    0000000

No comments:

Post a Comment