जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 17 July 2026

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्जाची मुदत वाढवली; विद्यार्थ्यांना दिलासा

 


         गोंदिया, दि. 17 : समाज कल्याण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचा निर्णय घेत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची मुदत 22 जुलै 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

         पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज पूर्ण करता आला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन विभागाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

      मुदतवाढीचे तपशील :

इयत्ता 11 वी व 12 वी साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख – 22 जुलै 2026

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्जाची अंतिम तारीख – 22 जुलै 2026

याशिवाय, शालेय विद्यार्थ्यांसाठी (इयत्ता 10 वी पर्यंत) पूर्वी निश्चित करण्यात आलेली 30 जून 2026 ही अंतिम मुदत कायम ठेवण्यात आली आहे.

        सर्व पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांनी केले आहे. ही संधी न दवडता वेळेत अर्ज करून शासकीय वसतिगृहाच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment