जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 2 July 2026

आदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पुर्व प्रशिक्षण योजना

 


           गोंदिया, दि.2 : आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, देवरी या कार्यालयाचे स्पर्धा परीक्षा माहिती व मार्गदर्शनाचे दुसरे सत्र दि.1 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी जमातीमधील उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, शाळा सोडल्याचा दाखला व जातीचे प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह या कार्यालयास दि.25 जुलै 2026 पर्यंत अर्ज सादर करावे.

           प्रशिक्षणार्थ्यांची शैक्षणिक व इतर पात्रता : सदर प्रशिक्षणासाठी उमेदवार हा किमान एस.एस.सी. उत्तीर्ण असावा. उच्च शैक्षणिक पात्रताधारक व टंकलेखक, संगणक, लघुलेखक आदी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवार आदिवासी जमाती प्रवर्गातील असावा, स्त्री अथवा पुरुष दोन्ही पात्र आहेत. उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे. उमेदवार गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यापैकी रहिवासी असावा. उमेदवाराने यापूर्वी सदर प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. उमेदवाराकडे रोजगार व स्वयंरोजगार (Employment) कार्यालयाचे ऑनलाईन नोंदणी कार्ड असावे. बँकेत खाते असलेल्या पासबुकच्या पहिल्या पानाची व आधारकार्डची छायाप्रत असावी.

          प्रशिक्षण कालावधी : प्रशिक्षण कालावधी तीन महिने पंधरा दिवस म्हणजेच दि.1 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2026 असा असेल. निवड प्राप्त उमेदवारांना देवरी येथे राहण्याची व्यवस्था स्वतःच करावी लागेल.

         विद्यावेतन : प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन देय राहील. असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी देवरी यांनी कळविले आहे.

                                                              0000000

No comments:

Post a Comment