गोंदिया, दि.17 : राज्य निवडणूक
आयोगाचे 15 जुलै 2026 चे पत्रान्वये राज्यातील बिगर व अंशत: अनुसूचित क्षेत्रातील
सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या व सन 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या,
नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीद्वारे
राबवावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.
त्यानुसार मतदार यादी ग्राह्य धरण्याचा
दिनांक 15 एप्रिल 2026. प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक
24 जुलै 2026. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दिनांक 24 जुलै ते 29 जुलै
2026 पर्यंत. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 4 ऑगस्ट 2026 आहे. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य
प्रशासन) मानसी पाटील यांनी कळविले आहे.
00000000
No comments:
Post a Comment