गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचा
दौरा
गोंदिया, दि. 30 जुलै : राज्याचे राज्यमंत्री तथा
गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचा 31 जुलै रोजी गोंदिया
जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यादरम्यान तेविविध बैठका घेऊन विकासकामांचा आढावा
घेणार आहेत.
गुरुवारी (दि. 30 जुलै)
सायंकाळी ते यवतमाळ येथून नागपूरकडे प्रयाण करून रात्री नागपूर येथे मुक्काम
करतील. त्यानंतर शुक्रवारी (दि. 31 जुलै) सकाळी नागपूरहून गोंदियाकडे प्रस्थान
करणार आहेत.
दुपारी 1 वाजता गोंदिया
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत तर 1: 30
मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व विभाग प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या नगरपरिषद सदस्यांसमवेत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे चर्चा
आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस खासदार राजेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर दुपारी 3 वाजता
जिल्हा नियोजन विकास समितीच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील. सायंकाळी गोंदियाहून
पुन्हा यवतमाळकडे प्रयाण करणार आहेत.
00000
No comments:
Post a Comment