गोंदिया, दि.15 :
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने अनुसूचित जातीतील
मांग/मातंग व या समाजातील बारा पोट जातीतील विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी
शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. जे विद्यार्थी-विद्यार्थीनी सन 2025-26 या
शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदवीका परीक्षामध्ये कमीत कमी
60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेले विद्याथी-विद्यार्थीनींनी
महामंडळाचे जिल्हा कार्यालय गोंदिया येथे शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला,
गुणपत्रिका, शाळेचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड, दोन फोटो, बोनाफाईड
सर्टिफिकेट, आधार कार्ड, मोबाईल नंबर यासह दि.27 जुलै 2026 पर्यंत संपर्क साधून
अर्ज सादर करावे.
अधिक
माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पतंगा मैदान, जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या मागे, गोंदिया येथे संपर्क साधावा. असे महामंडळाच्या जिल्हा
कार्यालयाने कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment