गोंदिया, दि.13 : भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 14 मे, 2026
रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive
Revision) कार्यक्रम (दिनांक 20/06/2026 ते 07/10/2026) घोषित केलेला आहे.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत
दिनांक 29 जुन 2026 पासून गणनापत्रक वाटप व डिजीटायझेशनचे काम सुरु झालेले आहे, गोंदिया
जिल्यात एकुण 11,23,805 एवढया मोठ्या प्रमाणावर मतदार संख्या सर्व मतदारांना गणना
पत्रक देऊन त्यांच्या माहितीचे डिजीटायझेशन दिलेल्या मुदतीत करणे बंधनकारक आहे.
दिनांक 10/07/2026, 11/07/2026,
12/07/2026 रोजी जिल्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत
समिती कार्यालय, नगरपालिका/नगर पंचायत कार्यालय येथे विशेष कॅम्प घेण्यात आले. आज
दिनांक 13/07/2026 रोजी जिल्हयामध्ये एकुण 3,51,829 मतदारांचे डिजीटायजेशन करण्यात
आले, ही टक्केवारी 31.31% इतकी आहे. गोंदिया जिल्हयातील EF 100 टक्के डिजीटायजेशन
झालेले आहे अशा पहिल्या चार BLO यांचे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते
सत्कार करुन गौरविण्यात आले. सत्कारीमुर्ती खालील प्रमाणे.
1) श्री श्रीकांत
तागडे, शिक्षक, BLO भाग क्रमांक 265 कोटजांभोरा तहसिल देवरी LAC 66 आमगांव
2) श्री राहुल काकडे,
ग्राम महसुल अधिकारी, देवरी BLO भाग क्रमांक 292 धवलखेडी तहसिल देवरी LAC 66
आमगांव
3) श्री पंकजकुमार
असाटी जिल्हा परीषद प्राथमीक शिक्षक BLO भाग क्रमांक 208 भजेपार तहसिल तिरोडा LAC
64 तिरोडा
4) श्री कैलास जी
पाटील ग्राम पंचायत अधिकारी BLO भाग क्रमांक 124 गुमाधावडा तहसिल तिरोडा LAC 64 तिरोडा
अध्यापही काही BLO यांचे डिजीटायजेशनचे
प्रमाण खुप कमी आहे. अशा BLO यांच्या कामात प्रगती दिसुन न आल्यास त्यांचेवर
कार्यवाही करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. SIR संबधीत काही
अडचणी आल्यास नागरीकांसाठी जिल्हास्तरावर हेल्पलाईन 24 X 7, 07182-236148 / 1950
या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
करीता मतदारांनी आपला सर्व तपशील अचुक
भरुन BLO यांचेकडे तात्काळ दयावा असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.
SIR प्रक्रीयेत राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय
प्रतिनीधी यांचा सहभाग देखील महत्तवपुर्ण आहे जिल्हयातील मान्यता प्राप्त राजकीय
पक्ष यांचे जिल्हाध्यक्ष यांची बैठक दिनांक 16/07/2026 रोजी सकाळी 10.30 वाजता
जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आयोजीत करण्यात आलेली आहे. या बैठकीत SIR च्या
कामातील प्रगती बाबतची माहीती राजकीय पक्ष यांना देण्यात येणार असून नागरीक व
राजकीय पक्ष यांचे विविध शंकाचे निरसन केले जाणार आहे.
*SIR स्थिती अहवाल (दि.13 जुलै 2026, सायं. 4.00 पर्यंत)*
*थोडक्यात माहिती :*
गोंदिया जिल्ह्यात विशेष संक्षिप्त
पुनरीक्षण (SIR) अंतर्गत कामाला वेग आला असून सर्व 1285 BLO प्रशिक्षित आहेत. जिल्ह्यात एकूण सुमारे 11.23
लाख मतदार असून त्यानुसार फॉर्म (EFs) वितरणाचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले
आहे.
एकूण 96.03% फॉर्म वितरित झाले आहेत. त्यापैकी
32.38% फॉर्म डिजिटाईज झाले आहेत. सुमारे 32.36% फॉर्म BLO कडून पडताळले गेले
आहेत. Self Mapping 15.94% तर Progeny Mapping 16.12% नोंदवले गेले आहे.
अनियमितता (Anomalies) 2.66% इतकी आढळली
आहे. तालुकानिहाय पाहता, आमगाव व अर्जुनी मोरगाव येथे कामाचा वेग चांगला असून इतर
भागांतही प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.
एकूणच, गोंदिया जिल्ह्यात SIR मोहिमेचे
काम समाधानकारक गतीने सुरू असून पुढील टप्प्यात डिजिटायझेशन आणि पडताळणीवर भर दिला
जात आहे.
00000000
No comments:
Post a Comment