गोंदिया,
दि.13 : वर्ष २०२६-२७ या वर्षासाठी विविध शासकीय योजनांअंतर्गत लाभार्थी निवडीचे
व्यापक नियोजन करण्यात आले असून, मागील वर्षाच्या तुलनेत अनेक योजनांमध्ये
लाभार्थी संख्येत लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी २६,२७४
लाभार्थ्यांना मिळणार लाभ. यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना अधिक प्रमाणात
योजनांचा लाभ मिळणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत
यंदा भात, कडधान्य, भरडधान्य तसेच पोषक तृणधान्य या घटकांमध्ये लाभार्थी संख्या
वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
भातासाठी ७४८७ वरून ८०००,
कडधान्यांसाठी ५४५० वरून ६०००, तर भात पड क्षेत्र कडधान्यांसाठी ३४४४ वरून ४०००
लाभार्थी नियोजित करण्यात आले आहेत. पोषक तृणधान्यांतही वाढ करून १०० वरून ५००
लाभार्थी करण्यात आले आहेत. भरड धान्यामध्ये मागील वर्षी ११४६ वरून यावर्षी
नियोजित लाभार्थी २००० करण्यात आलेले आहेत. कोरडवाहू क्षेत्र विकासासाठी १७३
लाभार्थ्यांवरून १८० लाभार्थी यावर्षी आहेत.
याशिवाय कृषी यांत्रिकीकरण
योजनांमध्येही वाढ दिसून येते. केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानात ३६२
वरून ५०० तर राज्य पुरस्कृत योजनेत १६७६ वरून २००० लाभार्थ्यांचे नियोजन आहे.
सिंचन क्षेत्रातही PMKSY (ड्रिप सिंचन योजना) अंतर्गत लाभार्थी ५६ वरून १०० पर्यंत
वाढविण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत
वैयक्तिक शेततळ्यांसाठी १६ वरून ५० लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. तसेच
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गतही
लाभार्थी संख्या वाढवून अनुक्रमे ४३ वरून २६४ आणि ५६ वरून २०० करण्यात आली आहे.
फळबाग लागवड योजनांमध्येही विशेष भर
देण्यात आला आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत १६ वरून १३४० तर रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेत
१११५ वरून १३४० लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत.
एकूणच, सन २०२५-२६ मध्ये २१,१५८
लाभार्थ्यांच्या तुलनेत सन २०२६-२७ मध्ये २६,२७४ लाभार्थ्यांचे नियोजन करण्यात आले
आहे. यामुळे कृषी क्षेत्रात विकासाला चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास
मदत होणार आहे.
0000000
No comments:
Post a Comment