गोंदिया जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेला वेग; ई-केवायसी प्रक्रियेत प्रगती
गोंदिया, दि. 30: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी
कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात सकारात्मक प्रगती होत असल्याचे
दिसून येत आहे. जिल्ह्यातील बँकांच्या समन्वयातून कर्जमाफी प्रक्रियेला चांगली गती
मिळत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार,
जिल्ह्यात ३०,२९५ कर्जखाती यशस्वीपणे अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी २१,६१६
शेतकरी पात्र ठरले असून, त्यातील १२,०४९ शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे.
उर्वरित प्रकरणांवरही वेगाने कार्यवाही सुरू असून लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण
होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेने आधार प्रमाणीकरणात ६८% प्रगती साधत आघाडी घेतली आहे. तसेच
राष्ट्रीयकृत (नॅशनलाईज) बँकांनीही ३७.८७% प्रमाणीकरण पूर्ण करत प्रक्रियेला गती
दिली आहे. आगामी काळात हे प्रमाण आणखी वाढेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला
आहे.
प्रशासन व बँकांच्या
संयुक्त प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळवून देण्यास मदत होत
असून, उर्वरित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोहीम अधिक वेगाने राबविण्यात
येत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनीही
आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी प्रक्रिया लवकर पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा,
असे आवाहन उपनिबंधक सहकार योगेश भाकरे वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment