गोंदिया, दि.21 : भारत सरकारच्या कौशल्य
विकास उपक्रमांतर्गत आयोजित इंडिया स्किल्स (India Skills) आणि वर्ल्ड स्किल्स
(World Skills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्ह्यातील पात्र
युवक-युवतींनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपली कौशल्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर
सिद्ध करण्याची संधी साधावी, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त
वाय.एस. शेंडे यांनी केले आहे.
देशातील विविध कौशल्य क्षेत्रांमध्ये
उत्कृष्ट प्रतिभा शोधून त्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने
या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. जिल्हा स्तरावरून निवड झालेल्या स्पर्धकांना
राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची संधी मिळणार असून, राष्ट्रीय
स्तरावरील उत्कृष्ट स्पर्धकांना World Skills Competition मध्ये भारताचे
प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
0000000
No comments:
Post a Comment