जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 20 August 2026

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अंतर्गत वडेगाव येथे दोन दिवसीय CPHC प्रशिक्षण उत्साहात संपन्न

 






            गोंदिया, दि.20 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' उपक्रमांतर्गत वडेगाव येथे दोन दिवसीय 'सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा' (CPHC - Comprehensive Primary Health Care) प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.

         या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना केल्या. याप्रसंगी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत आरोग्य कर्मचाऱ्यांना दैनंदिन आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे पुरवण्यासाठी विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रात्यक्षिके, व्याख्याने व केस स्टडीच्या माध्यमातून सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

पहिला दिवस : प्राथमिक काळजी, माता-बाल संगोपन व आपत्कालीन सेवा कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी नोंदणी व उद्घाटनानंतर विविध सत्रांमध्ये आरोग्य सेवांच्या पायाभूत घटकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 * आयुष्मान आरोग्य मंदिर: डॉ. जी. एस. खोब्रागडे (Observer) यांनी संवादात्मक सत्राद्वारे आयुष्मान आरोग्य मंदिराची रचना आणि उद्दिष्ट्ये यावर प्रकाश टाकला.

 * माता व बाल आरोग्य: श्रीमती कुंदा कुंभरे यांनी गरोदरपणातील, प्रसुतीदरम्यान आणि प्रसुतीपश्चात घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. नवजात शिशु व अर्भकाच्या आरोग्य सेवांवर डॉ. सचिन उके यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले.

 * आणीबाणी व बाल आरोग्य: डॉ. राजेश वेलमकर यांनी 'इमर्जन्सी केअर व सीपीआर (CPR)' यावर प्रात्यक्षिक (डेमो चार्ट) सादर केले, तर श्रीमती रंजना रोकडे यांनी बालक व किशोर वयातील आरोग्य सेवांवर केस स्टडी घेतली.

 * आजार नियंत्रण व कुटुंब नियोजन: श्रीमती कुंदा कुंभरे यांनी कुटुंब नियोजन साधनांवर रोल प्ले केला. विजय मेश्राम यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व किरकोळ/संसर्गजन्य आजारांच्या व्यवस्थापनावर व्याख्यान दिले. डॉ. राजेश वेलमकर यांनी असंसर्गजन्य आजारांची छाननी व प्रतिबंधावर गटचर्चा घेतली.

दुसरा दिवस : क्षेत्र भेट, प्रात्यक्षिके व मानसोपचार

दुसऱ्या दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष कौशल्यांवर व क्षेत्र अभ्यासावर भर देण्यात आला.

 * क्षेत्र भेट (Field Visit): सत्राच्या सुरुवातीला सुरजलाल दोनोडे यांनी कार्यक्षेत्र भेटीदरम्यान CBAC फॉर्म भरणे व HR मदर भेट याविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले.

 * विशेष आरोग्य काळजी : डॉ. जी.एस. खोब्रागडे यांनी डोळे व कान समस्यांची प्राथमिक काळजी यावर प्रॅक्टिकल डेमो दिला. डॉ. राजेश त्रिपाठी यांनी तोंडाच्या आरोग्याची मूलभूत काळजी यावर डेमॉन्स्ट्रेशन दिले, तर डॉ. राजेश बेलमकर यांनी वृद्धापकाळातील काळजी व वेदनाशामक उपचारांवर केस चर्चा घेतली.

 * इमर्जन्सी व मानसोपचार: श्रीमती रंजना रोकडे यांनी तत्काळ वैद्यकीय सेवेसाठी BLS (Basic Life Support) डेमो दिला. दीपक आंगुलवार यांनी मानसिक आरोग्य, समुपदेशन व योग प्रात्यक्षिके करून घेतली.

 * प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योग व आयुष उपचार पद्धतीचा अवलंब यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा शेवट सर्व सहभागी कर्मचाऱ्यांचे अभिप्राय आणि समारोपाने झाला. या प्रशिक्षणामुळे वडेगाव व परिसरातील नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.             

                                                                      000000000


No comments:

Post a Comment