जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 6 August 2026

माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती : अर्ज करण्याचे आवाहन

 


         गोंदिया, दि.6 : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत किमान 60% गुणानी उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना पुढील शिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांनी 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

          यासाठी लाभार्थीचा अर्ज, शिष्यवृत्ती फॉर्म, ओळखपत्राची छायांकीत प्रत, बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्तीर्ण झालेल्या वर्गाची गुणपत्रिकेची झेरॉक्स व इतर कुठल्याही योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत. ज्या माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती अंतर्गत शिष्यवृत्ती मिळावयाची आहे, अशा पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाची शिष्यवृत्ती लागु होत नाही. ज्या पाल्यांनी सीईटी, जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी प्रकरणासोबत गॅप सर्टिफिकेट जोडावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे संपर्क साधावा.

00000000

No comments:

Post a Comment