गोंदिया, दि.13 : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य
दिनानिमित्त शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस मुख्यालय
मैदान, कारंजा (गोंदिया) येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण व संचलनाचा मुख्य शासकीय
समारंभ होणार आहे.
याप्रसंगी उद्योग, सार्वजनिक बांधकाम
(सार्वजनिक उपक्रम वगळून) उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व
जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक
यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
येथील नविन प्रशासकीय इमारतीत उविभागीय
अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या हस्ते सकाळी 7.30 वाजता आणि जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहण
होणार आहे.
सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात
समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने
सोबत कोणतेही बॅग किंवा तत्सम वस्तू आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य
शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था
आदींनी त्यांचे ध्वजारोहणाचे समारंभ सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर
आयोजित करावेत, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment