जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 14 August 2026

निवृत्तीवेतन धारकांसाठी गोंदियात समाधान शिबीर संपन्न

 


           गोंदिया, दि.14 : महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनासंबंधित येणाऱ्या समस्यांचे निराकारण करण्याकरिता तसेच राज्य शासनाच्या नवीन उपक्रमाबाबत व शासनाचे अद्यावत निर्णय गोंदिया जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृतीवेतनधारकांना माहिती देण्याकरिता जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया तर्फे दि.11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

          या कार्यक्रमास कोषागार कार्यालय गोंदिया तर्फे अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा), कोषागार कार्यालयातील निवृत्तीवेतन शाखेचे सर्व कर्मचारी तसेच निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) समीर देशमुख यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी समाधान शिबिराच्या आयोजनाचे  उद्दिष्ट, सेवानिवृत्ती प्रकरणी जिल्हा कोषागार कार्यालयाची भूमिका तसेच त्यांचे कर्तव्य याबाबत माहिती दिली.

         या समाधान शिबिरात लाईफ सर्टिफिकेट (LIFE CERTIFICATE), डिजिटल सर्टिफिकेट (DIGITAL LIFE CERTIFICATE), बँकेच परस्पर बदल, मृत प्रमाणपत्र सादर करणे, निवृत्तीवेतन वाहिनी, महाउपलब्धी ॲप, निवृत्तीवेतन सुधारित करणे व एनपीएस/डीसीएजी (NPS/DCAG) च्या प्रलंबित प्रकरणांबाबत विस्तृतपणे माहिती देण्यात आली.

       यावेळी खाजगी अनुदानित शाळा अधिकारी/कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री पारधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रविण ठोंबरे, कनिष्ठ लेखापाल (निवृत्तीवेतन शाखा) जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.

                                                            0000000

No comments:

Post a Comment