गोंदिया, दि.10 : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील
11 वी, 12 वी व त्यानंतरचे व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमात शिक्षण
घेत असलेले, सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व
शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रीयेनंतर वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या
विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
https//hmasnew.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहे. सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात
आलेली आहे.
स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना
भोजन, निवास, निर्वाह भत्ता व शैक्षणिक साहित्यासाठी लागणारी आर्थिक मदत थेट
विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत केली जाते. त्याकरीता
विद्यार्थ्यांना https//hmasnew.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करणे
आवश्यक असते.
शैक्षणिक सत्र 2026-27 नुतणीकरणाच्या
(Renewal) विद्यार्थ्यांसाठी https//hmasnew.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज
भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरणेबाबत तसेच आवश्यक
कागदपत्राच्या माहितीकरीता दि.11 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता डॉ. बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, गोंदिया येथे शिबिराचे
आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी
हजर रहावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment