जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 6 August 2026

निवृत्तीवेतन धारकांसाठी मंगळवारी समाधान शिबिराचे आयोजन

 

गोंदिया, दि.6 : महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनासंबंधित येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता तसेच राज्य शासनाच्या नवीन उपक्रमाबाबत व शासनाचे अद्यावत निर्णय गोंदिया जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना माहिती देण्याकरीता जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया तर्फे मंगळवार दि.11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या समाधान शिबिरात उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे. तसेच शासनाच्या नवीन उपक्रमाबाबत व अद्यावत शासन निर्णयांबाबत जाणून घ्यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी तौसिफ हसीन व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) समीर देशमुख यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment