गोंदिया, दि.7 : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये बारावी, पदविका
तसेच पदवी परीक्षेत किमान 60% गुणाने उत्तीर्ण होऊन वर्ष 2026-27 मध्ये अभियांत्रीकी,
वैद्यकीय, बी.डी.एस., बी.बी.एस., बी.सी.ए., बी.एस.सी. (बायोटेक), एम.सी.ए. नर्सींग,
बी.फार्म. व इतर व्यवसायिक शिक्षण घेत आहेत त्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्ड
दिल्ली यांचेकडून पंतप्रधान शिष्यवृत्ती देण्यात येते.
तरी पात्र माजी सैनिक
किंवा विधवांच्या पाल्यांनी केंद्रीय सैनिक बोर्ड दिल्ली यांच्या वेबसाईट www.ksb.gov.in यावर ऑनलाईन अर्ज भरुन
सर्व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय
परिसर, गोंदिया येथे 31 डिसेंबर 2026 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,
गोंदिया यांनी केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment