जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 17 August 2026

जिल्हा न्यायालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रितेश वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

 

         गोंदिया, दि.17 : भारतीय स्वातंत्र्याच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमीत्त 15 ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे सकाळी 7.30 वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रितेश वाघमारे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

         सदर कार्यक्रमात न्यायाधिश ए.एस. प्रतिनिधी जिल्हा न्यायाधीश-1 गोंदिया, एम.टी.आसीम जिल्हा न्यायाधीश-2 गोंदिया, ए.सी. खुराना जिल्हा न्यायाधीश-4 गोंदिया, एन.के. वाळके सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया, एम.के. सोरते दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गोंदिया, श्रीमती वाय.के. राऊत मुख्य न्यायदंडाधिकारी गोदिया, ए.व्ही. ढोरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गोंदिया, श्रीमती एस.व्ही. चरडे, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गोंदिया, श्रीमती ए.एम. कासीम सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर गोंदिया, श्रीमती एस.के. बिराजदार 3 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर गोंदिया, व्ही.एच. शेंडे 4 थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर गोंदिया व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सचिन बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

         तसेच अॅड. निना दुबे सचिव जिल्हा वकील संघ गोंदिया, पी.झेड. शेख कोषाध्यक्ष जिल्हा वकील संघ गोंदिया व जिल्हा वकील संघाचे इतर पदाधिकारी आणि जिल्हा सरकारी वकील महेश चांदवानी, सरकारी वकील वसंत चुटे व इतर तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ओ.जी.मेठी, श्री. बडे, व्ही.एल. जानी, राजकुमार बोंबार्डे, अॅड. शबाना अंसारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता ए.आर. कुकडे, एम.पी. पटले, ए.एम. भालेराव, एन.पी. गोखले, एस.एस. बागडे, एस.व्ही. गावंडे, डी.सी. कनोजिया यांनी सहकार्य केले.

0000000

No comments:

Post a Comment