जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 12 August 2026

भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांची जयंती साजरी

 




       गोंदिया, दि.12 : भारतातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे जनक तथा भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती आज नवीन प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा ग्रंथालयात साजरी करण्यात आली. डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाची मध्यवर्ती संकल्पना "ग्रंथालय : लोकांना जोडणे, ज्ञानाचे जतन करणे, भविष्याचे सक्षमीकरण" अशी आहे.

          याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे-निमसरकर यांनी डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे, ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मंडपे व ग्रंथालय सदस्य उपस्थित होते.

          श्रीमती निमसरकर यांनी यावेळी सांगितले की, डॉ. एस.आर. रंगनाथन यांनी सुरू केलेली ग्रंथालय ठेवण्याची वैज्ञानिक पद्धत आजही उपयोगी आहे. गाव पातळीपासून ते महानगरापर्यंतच्या ग्रंथालयात पाळली जाते. यामुळे ग्रंथालयात पुस्तक शोधताना सुसूत्रता दिसून येते. रंगनाथन यांच्या योगदानामुळे ग्रंथालयाच्या कामकाजात एकरूपता साधता आली आहे.

          कार्यक्रमात जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी ग्रंथालयाचे वर्गणीदार सभासद होऊन ग्रंथालयातील विविध सुविधा व ज्ञानसंपदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

         कार्यक्रमास श्रीमती अस्मिता मंडपे, अंकुशकुमार कटरे, अक्षय गेडाम तसेच मोठ्या संख्येने वाचकवर्ग उपस्थित होता.

0000000

No comments:

Post a Comment