गोंदिया, दि.3 : भारत
सरकारच्या उत्तर पूर्व क्षेत्र विकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या
"अष्टलक्ष्मी दर्शन युवा देवाण-घेवाण कार्यक्रम (Youth Exchange
Programme)" अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पात्र युवक व युवतींची निवड
करण्यात येणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या
परिपत्रकानुसार इच्छुक व पात्र युवक-युवतींकडून अर्ज/नामनिर्देशन प्रस्ताव
मागविण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाचा
उद्देश उत्तर-पूर्व भारतातील राज्यांशी सांस्कृतिक, सामाजिक व राष्ट्रीय
एकात्मतेची भावना दृढ करणे तसेच युवकांना तेथील संस्कृती, परंपरा आणि जीवनशैलीचा
प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे हा आहे. कार्यक्रमाचा कालावधी 8 दिवसांचा निवासी असून
15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. (शक्यतो पदवीच्या दुसऱ्या
किंवा तिसऱ्या वर्षातील युवांचा समावेश असावा).
शैक्षणिक, सामाजिक,
सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेल्या तसेच युवा पुरस्कारार्थी, NCC, NSS,
भारत स्काऊट्स ॲन्ड गाईड्स मधील रोवर्स आणि रेंजर्स युवक-युवतींना प्राधान्य
देण्यात येणार आहे.
इच्छुक व पात्र
युवक-युवतींनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज/नामनिर्देशन प्रस्ताव विहित मुदतीत
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी
कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया येथे संपर्क साधावा, असे
आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर
यादव यांनी केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment